Breaking News

महालक्ष्मी हिवरे येथे शिकारीच्या नादात बिबट्या झाला जेरबंद


चांदा (प्रतिनिधी): नेवासा तालक्ुयातील महालक्ष्मी हिवरे येथे अंदाजे साडेचार वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून चांदा, माका, महालक्ष्मी हिवरा, कौठा, रस्तापुर परिसरात अनेक शेळ्या, कुत्रे, फस्त करुन धुमाकुळ घालणारा नर जातीचा बिबट्या पहाटे साडेतीनच्या दरम्यान महालक्ष्मी हिवरा येथील मुळाचे माजी संचालक मारुती आश्राजी केदार यांच्या वस्तीलगत 15 दिवसांपुर्वी लावलेल्या पिंजर्‍यात शिकारीच्या नादात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद होताच त्याने जोरजोरात डरकाळ्या मारल्या. एकाच बाजुने सारखा डरकाळ्यांचा आवाज येवू लागल्याने वस्तीवरील लोक जागे झाले. बिबट्या जेरबंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बिबट्या पाहण्यासाठी महालक्ष्मी हिवरे परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.