अश्विनचे २०० बळी


मुंबई प्रतिनिधी

बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतावर सामन्याच्या चौथ्या दिवशी ३१ धावांनी विजय मिळवला. यात भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी यासामन्यात भारताच्या आर.अश्विनने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. या कसोटीमध्ये त्याने २०० बळी आपल्या खात्यात टाकले.अलिस्टर कुकसारख्या दिग्गजफलंदाजाला अश्विनने सामन्याच्या दोनही डावात सारख्याच पद्धतीने त्रिफळाचित केले. यासह कुकला कसोटी क्रिकेटमध्ये सार्वधिक ९ वेळा बाद करणारा अश्विन पहिला खेळाडूठरला. पण त्यापेक्षा मोठा विक्रम हा अश्विनने विराट कोहलीच्या साथीने केला. अश्विनने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताकडून खेळताना कसोटी सामन्यांमध्ये आपले २००बळी पूर्ण केले.अश्विनने सामन्याच्या पहिल्या डावात ४ बळी टिपले, तर दुसऱ्या डावात ३ बळी टिपले. पण दुर्दैवाने भारताला हा सामना गमवावा लागला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget