Breaking News

पेन्शन योजनेचा लाभ घ्या : काळे


कोपरगांव प्रतिनिधी

मुलांच्या शिक्षणासाठी, आयुष्याच्या उतार वयात आपल्या कोणतीही आर्थिक अडचण येवू, नये यासाठी मनात असूनही आर्थिक खर्च वाढवू नये. याची प्रत्येक महिला काळजी घेत असते. महिला वर्ग संपूर्ण आयुष्यभर पै-पै जोडून आपला संसार करीत असते. त्यासाठी शासनाने ६० वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी पेन्शन योजना सुरु केली असून सर्व महिलांनी या पेन्शन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांनी केले.

शहर आणि तालुक्यातील बचतगटाच्या महिलांना सामाजिक सुरक्षा योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी काळे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, महिलांच्या विविध अडचणी सोडविणे, महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे यासोबतच महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रियदर्शनी महिला मंडळ काम करीत आहे. या पेन्शन योजनेअंतर्गत महिलांना वृद्धापकाळासाठी पेन्शन तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला विमा सुरक्षा मिळणार आहे. याप्रसंगी कोपरगाव शहर व तालुक्यातील बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.