Breaking News

अध्यात्माच्या मार्गातून देशात सौहार्दपूर्ण वातावरण : भागवत


राहाता 

भारत देशात नानाप्रकारच्या भाषा, प्रांत, जाती, धर्म असून प्रत्येक धर्म जाती परंपरेने साधू संत असतात. त्यांच्या माध्यमातून अध्यात्माचा मार्ग सापडत असतो. त्यातून भारत देश एक होत आहे. अध्यात्माच्या मार्गातून देश सामर्थ्यशाली होऊन जगाला प्रेम आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करील, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसंघाचे सरसंघचालक यांनी मोहन भागवत शिर्डीत व्यक्त केली.

शिर्डीत आयोजित १७१ व्या अखंड हरिनाम सप्ताहात प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, नानाजी जाधव, साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, खा. सदाशिव लोखंडे, आ. मोनिका राजळे, आ.स्नेहलता कोल्हे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्षा योगिता शेळके, नागरध्यक्षा ममता पिपाडा, आदी उपस्थित होते.

भागवत म्हणाले की, अध्यात्म सांगते की, जे आपल्या पाहिजे ते दुसऱ्याचे हिरावून ना घेता मिळाले पाहिजे. ती खरी कुशलता आहे. अशा अध्यात्मात संत, साधूच्या माध्यमात येऊन आपला अध्यात्मिक विकास केला पाहिजे. त्यातून विश्वातील प्रत्येक मनुष्य सुखी व्हावा यासाठी प्रयत्न केला पाहिजे. इतका समर्थ भारत देश व्हावा असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या जाती धर्माचा कलियुगात साधा सोपा मार्ग आहे. तो अंगिकारला पाहिजे. पूर्वीच्या काळापासून संतांनी अगोदर समाज जागृती आणण्याचे कार्य केले आहे. ते आजतागायत सुरू आहे. भारत देशाने जगाला धर्म दिला आहे.