Breaking News

कठड्याला धडकून कार कोसळली पाण्यात, कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू


पुणे : पुण्याच्या फुरसुंगीयेथील सोनार पुलावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या पहारी एक सॅन्ट्रो कार पुलावरून चालली होती. आणि पुलाजवळ असलेल्या कठड्याला कार ध़कली आणि सरळ कठडा तोडून गाडी पुलाखालील पाण्यात कोसळली. या कार अपघातात कारमध्ये असलेल्या कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे.