भूखंड आरक्षणास लिंगायत समाजाचा विरोध


पाथर्डी -(प्रतिनिधी) 
शहरातील बगीचा प्रयोजनासाठी आरक्षण उठवून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी जागेवर आरक्षण टाकण्याच्या प्रस्तावास लिंगायत समाजबांधवानी पाथर्डी प्रस्तावीत भूखंड आरक्षणास लिंगायत समाजाचा विरोध दाखवत नगररचना विभागाच्या सहसंचालकासमोर हरकती नोंदवल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील धामणगाव रोड तसेच माणिकदौंडी रोड लगत असलेल्या स.नं. 333/37 वरील बगीचा साठीचे आरक्षण उठवण्यासाठी 2016 मध्ये पालिका बैठकीत आरक्षण उठवून इतर ठिकाणी आरक्षण टाकण्याचा ठराव घेण्यात आला. त्यावेळी पालिका बैठकीत तत्कालीन नगरसेवक डॉ.दीपक देशमुख व डॉ शारदा गर्जे यांनी सदरचे आरक्षण उठवण्यास जोरदार हरकती नोंदवल्या परंतु पुढे बगीचा प्रयोजनासाठी आरक्षित ठेवलेली सर्व्हे क्रमांक 333/37 मधील जागेवरील आरक्षण हटवून ते आरक्षण शहराच्या जवळ असलेल्या लिंगायत समाजाच्या स्मशान भूमीसाठीच्या सर्व्हे क्रमांक 327 वर प्रस्तावित करण्यात आले.
प्रस्तावित आरक्षणा वरील हरकतीची सुनावणी मंगळवारी पालिका सभागृहात नगररचना सहसंचालक नाशिक प्रतिभा भदाने,नगर रचनाकार किशोर पाटील, सहाय्यक नगररचनाकार संदीप जोशी यांच्या समोर झाली यावेळी नगरसेवक अनिल बोरुडे यांनी सर्व्हे क्रमांक 333/37 वरील आरक्षणा बाबत तत्कालीन पालिका पदाधिकारी व नगररचना विभाग चुकीचे कागदपत्र तयार करून सदरचे आरक्षण हटवण्यास विरोध दर्शवत लेखी हरकत नोंदवली. आपण या प्रश्‍नावर मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे सांगितले. लिंगायत स्मशानभूमी जागेत आरक्षण प्रस्थावित केल्याच्या निषेधार्थ समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष तथा मनसे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ यांचे नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या कार्यालयात जावून पालिका प्रशासन, नगररचना कार्यालय, नगररचना मंत्रालय यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेत बगीचा आरक्षण टाकल्यास समाज भावना दुखावल्या जातील व स्मशान भूमीत बगीचा केल्यास त्यामध्ये कोणीही जाणार नाही असे सांगत समाजाच्या वतीने लेखी हरकती नोंदवल्या.
यावेळी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी साईनाथनगर,आसरानगर, फुलेनगर,शिवशक्तीनगर,एडके कॉलनी,इंदिरानगर या प्रभागातील नागरिकांसाठी सर्व्हे क्रमांक 333/37 ही जागा बगीचासाठी आरक्षित केली असून आरक्षण हटवल्यास प्रशासना विरुद्ध मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला.आलेल्या हरकती शासनाला कळवून योग्य निर्णय घेतला जाईल असे सहसंचालक नगररचना नाशिक प्रतिभा भदाने यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget