Breaking News

व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन; जयराम, मिथुनची उपांत्य फेरीत धडक


नवी दिल्ली वृत्तसंस्था

व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार सर्वस्वी अजय जयरामवर अवलंबून आहे. याला साजेसा खेळ सध्या जयराम करताना दिसत आहे. नवी दिल्ली वृत्तसंस्था

भारताच्या अजय जयराम आणि मिथुन मंजूनाथने व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अजय जयरामने कॅनडाच्याशेंग शिओडोंगवर २६-२४, २१-१७ अशी मात केली. ही लढत ४२ मिनिटे चालली. जयराम याने कॅनडाच्या शेआंग झिओदोंग याच्यावर २६-२४, २१-१७ अशा संघर्षपूर्ण लढतीनंतर मातकेली. तीस वर्षीय खेळाडू जयराम याला उपांत्य फेरीत सातव्या मानांकित युई इगाराशी याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. मंजुनाथ याला चीनच्या झोऊ झेकीयाच्याविरुद्ध १७-२१, २१-१९, २१-११ असा विजय मिळविताना चिवट झुंज द्यावी लागली. त्याला पुढच्या फेरीत इंडोनेशियाच्या शेशार हिरेन रुस्तोव्हितो याच्याशी झुंजावे लागणारआहे.

माजी राष्ट्रीय विजेता रितुपर्ण दास याला थायलंडच्या फितायापेर्न चैवान याने २१-१९, २१-१४ असे पराभूत केले.