जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश


अहमदनगर- जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त रेसिडेन्सीअल माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 2 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रूईछत्तीशी येथील 19 वर्षे वयोगटातील मुलींनी व मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच दि. 3 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या खो-खो स्पर्धेत याच विद्यालयातील 19 वर्षे मुली व 17 वर्षे मुलांच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत भांबरे ऋतुजा, साके आश्‍विनी, देवकर प्रतिक्षा, गुंड हर्षदा, मुरूमकर प्रज्ञा, वारे प्रिया, ढंगारी रवी, वाबळे सुशांत, भोस तेजस, खाकाळ प्रशांत, शेळके राहूल, गोरे ऋषिकेश या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. दत्ता पाटील , ताराबाई पाडळकर , कैलास कोरके, रंगनाथ जगधने, भाऊसाहेब पवार यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget