Breaking News

सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा

जामखेड श. प्रतिनिधी - घरकूलाचा लाभ घेण्यास अपात्र ठरविल्याचा राग आल्याने ग्रामविकास अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अ‍ॅट्रासिटीचा खोटा गुन्हा मागे घ्यावा अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वधर्मीयांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी जामखेडच्या सकल मराठा समाज्याच्या वतीने दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायत मध्ये रामचंद्र अभिमन्यू शिंदे हे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करत आहेत. जवळा गावातीलच एका महिलेने शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत घरकूलासाठी अर्ज के ला होता. परंतु शासन निकषानूसार ते घरकूलाचा लाभ घेण्यास अपात्र ठरवले. निकषात बसत नसल्याने घरकूल देता येणार नाही असे ग्रामविकास अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले. याचा राग मनात धरून घरकूल साठी अपात्र ठरलेल्या संबंधित महिलेने ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला दि 18 ऑगस्ट रोजी अट्रासिटी व विनयभंगाचा खोटा गून्हा दाखल करुन अधिकार्‍याला फसवले आहे. तसेच संबंधित महिलेने पाच लाखांची मागणी केली होती ते पैसे न दिल्याने सदर गून्हा दाखल करून ग्रामसेवक शिंदे यांच्यावर अन्याय झाला आहे हा अन्याय दूर करण्यासाठी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे. या घटनेची तात्काळ सत्यता पडताळून पहाणी करावी अधिकार्‍याच्या विरोधात जानुनबुजुन खोट्या गुन्ह्यांची गैरमार्गाने होत असलेली फसवणूक थांबवावी अन्यथा जामखेड सकल मराठा समाज्याच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे, सरपंच दादासाहेब हवा सरनोबत, शरद कार्ले, दत्तात्रय शिंदे, पृथ्वीराज वाळुंजकर, अनिल पाटील, नितीन राळेभात, सोमनाथ पोकळे, संजय काशिद, अण्णा मांजरे, अक्षय ठाकरे, काकासाहेब वाळुंजक र, नगरसेवक दिंगबर चव्हाण, बापूसाहेब घाडगे, बाळासाहेब ठाकरे, कैलास शिंदे, चेअरमन हनुमंत शिंदे, सुनील शिंदे, चेअरमन राजेंद्र शिंदे. रुपचंद धुमाळ, जेष्ठ शिक्षक धुमाळ, विष्णू धुमाळ,यांच्या सह अनेक सकल मराठा समाज्याच्या बांधवांनी दिला आहे. या प्रकरणी दोन दिवसापूर्वीच ग्रामसेवक संघटनेचे युवराज ढेरे यांच्यासह जिल्ह्यातील बारा तालुक्यातील ग्रामसेवकांनी ग्रामविकास अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अ‍ॅट्रासिटी चा खोटा गुन्हा मागे घ्यावा अन्यथा कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला