Breaking News

गिरीश महाजनांचं 'प्रमोशन','या' जिल्ह्याची धुरा


जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील घवघवीत यशानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच भाजपमध्ये वजन वाढलं आहे. येणाऱ्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या धुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश स्तरावरील प्रमुख नेत्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहेत.

सध्या धुळे पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची तर जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनिल गोटे यांच्यात राजकीय कलह सुरू असल्याचे सर्वश्रुत आहे. पक्षाआंतर्गत सुरु असलेले गतातटाचे राजकारण पक्षासाठी डोकेदुखी ठरू लागले आहे.