निवड समिती सदस्यांचे मानधन वाढवण्यास मंजुरी


मुंबई प्रतिनिधी

टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यांचे मानधन वाढवण्याचा निर्णयाला बीसीसीआयने मंजूरी दिल्याचे वृत्त आहे. मानधन वाढीप्रमाणे या सदस्यांचे वार्षिक पगार ३० लाखरूपयांनी तर मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांचा पगार २० लाख रुपयांनी वाढणार आहे.

१२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत क्रिकेट ऑपरेशन्स विभागाने मानधन वाढीचा हा प्रस्ताव प्रशासकीय समितीच्या सल्ल्याने ठेवला होता. यानुसार भारताचे माजी यष्टिरक्षक सबाकरीम यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशन विभागाने हा निर्णय घेतला आहे. मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांचे वार्षिक मानधन आता ८० लाखरुपयांवरून एक कोटी रूपये झाले आहे. या समितीच्या अन्य दोघांचा वार्षिक पगार ६० लाख रुपयांवरून ९० लाख झाले आहे.

याशिवाय, जूनियर निवड समितीच्या वार्षिक पगारातही वाढ करण्यात आली आहे. सदस्यांची वार्षिक पगार ६० लाख तर मुख्य निवडकर्त्याची वार्षिक पगार ६५ लाख रूपये करण्यातआली आहे. महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या सदस्यांच्या वार्षिक पगारातही भरघोस वाढ करण्यात आली आहे. सदस्यांचा वार्षिक पगार २५ लाख तर मुख्यनिवडकरत्याचा पगार ३० लाख करण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget