Breaking News

अज्ञात वाहनाच्या धडकेने एक ठार


घारगाव : प्रतिनिधी

भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने ४५ वर्षीय इसमास धडक दिली. त्यामुळे तो जागीच ठार झाला. पुणे-नाशिक महामार्गावर आंबीखालसा शिवारात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला.

आंबीखालसा शिवारातील एका हॉटेलसमोर जाणारा वाशिम दास (पश्चिम बंगाल) हा रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे हे कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. या इसमाचा मृतदेह शवविछेदनासाठी संगमनेरला पाठविण्यात आला. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.