Breaking News

जम्मूमध्ये पाकिस्तानी अतिरेक्याचा खात्मा ; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत


अनंतनाग/वृत्तसंस्था : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे भारतीय लष्कर आणि अतिरेकी यांच्यात चकमक उडाली आहे. या ठिकाणी तीन अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यापैकी एका पाकिस्तानी अतिरेक्यास कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. शुक्रवारी सकाळपासून कोकरनाग येथे भारतीय लष्कर अतिरेक्यांचा सामना करत आहेत. येथे तीन अतिरेकी लपले असण्याची शक्यता असून याबाबत पूर्ण माहिती अद्याप मिळाली नाही. काही दिवसांपासून या परिसरात वारंवार भारतीय लष्कर व अतिरेकी यांच्यात चकमकी घडत आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ठार झालेला अतिरेकी हा जैश ए मोहम्मद या संघटनेचा आहे. त्याने यापुर्वाही अनेक हिंसक कारवाईत सहभाग घेतला होता. स्थानिक पोलिसांनी सांगितले, की गुरुवारी तंगमार परिसरात कनजार येथे काही अज्ञातांनी वन विभागाच्या एका कर्मचार्‍यास गोळी मारली, यात वन्य कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाला.