Breaking News

धनगर आरक्षणासाठी आज पिंपरीमध्ये मोर्चा


पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने उद्या (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. आकुर्डीतील तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असून या मोर्चाची जोरदार तयारी सुरु आहे. आकुर्डीतील तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता मोरवाडीतील अहिल्यादेवी पुतळा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. शगुनचौक, काळेवाडी पुलावरुन पाचपीर चौक, आठवण हॉटेल समोरुन चिंचवड गावाकडे जाणा-या नदीवरील पुलावरुन केशवनगर मार्गे चिंचवडगाव चापेकर चौक, तेथून चिंचवडे नगरमार्गे, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर पुलावरुन मोर्चा आकुर्डीतील तहसील कार्यालयावर धडकणार आहे.