Breaking News

वंचितांना व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हीच उमेशबाबूंना खरी श्रद्धांजली - मुख्यमंत्रीनागपूर : गरीब, वंचित व पीडितांसाठी आयुष्यभर संघर्षरत असलेल्या उमेशबाबूंनी समाजसेवेला वाहून घेतले होते. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वंचितांना व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

वसंतराव देशपांडे सभागृह येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठान व उमेशबाबू चौबे मित्र परिवार यांच्या वतीने स्व. उमेशबाबू चौबे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार डॉ. आशिष देशमुख,डॉ. मिलींद माने, दत्ता मेघे, सतीश चतुर्वेदी, यादवराव देवगडे, गिरीश गांधी,अटल बहादुर सिंग, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता तानाजी वनवे आदी उपस्थित होते.