Breaking News

तिर्थक्षेत्रांची स्वच्छता ठेवून पावित्र्य जपा : तांबे


संगमनेर प्रतिनिधी

तालुक्यातील विविध तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी पायी प्रवास करणार्‍या भाविकांनी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळावा. वृक्षारोपन आणि संवर्धन करावे. धार्मिक व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सर्वांनीच स्वच्छता ठेवून त्यांचे पावित्र्य जपावे, असे आवाहन दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात यांनी म्हटले आहे, देवदर्शन करण्यासाठी भाविक पायी दिंडीच्या निमित्ताने खांडेश्‍वर, निझर्णेश्‍वर, बाळेश्‍वर, रामेश्‍वर, शिर्डी अशा विविध ठिकाणी जात असतात. अशा वेळी बरोबर प्लास्टिक पिशव्यांमध्ये खाद्य पदार्थ, फळे, द्रोण, चहाचे कप, थर्माकोलच्या डिश, पाण्याचे पाऊच बरोबर घेऊन जातात. तसेच अनेक तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. अशावेळी भाविक प्लास्टिकच्या सामानांचा वापर करतात. याची काळजी घेत भाविकांनी रस्त्यांच्याकडेने तसेच डोंगरावर फळांच्या बिया, बरोबर घेऊन बीजरोपण आणि वृक्षारोपन करावे.