Breaking News

सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या डोंगरे कुटुंबीयांचा गौरव


अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या निमगाव वाघा येथील डोंगरे कुटुंबीयांचा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
सहकार सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी राष्ट्रीय कुस्तीपटू तथा ज्युदो खेळाडू प्रियंका डोंगरे, प्रतिभा डोंगरे व पै.संदिप डोंगरे यांचा आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार व गुवाहाटी (आसाम) येथील पोलीस अधिक्षक इंजि. प्रतिक ठुबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, शिवशाहीर विजय तनपुरे, शिक्षण संचालक दिनकर टेमकर, इंजि. विजय ठुबे, सुजाता ठुबे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुंजाळ, प्रकाश कराळे, राजश्री शितोळे, अशोक वरकड, अप्पासाहेब ढूस, ज्ञानदेव पांडूळे आदी उपस्थित होते.
प्रियंका डोंगरे हीने राज्यस्तरीय कुस्ती व राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी केली. तर प्रतिभा डोंगरे व पै.संदिप डोंगरे यांनी राज्यस्तरीय ज्युदो आणि कुस्ती स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच पै.नाना डोंगरे यांचे सामाजिक क्षेत्रात चालू असलेले कार्य व राज्य कुस्ती स्पर्धेच्या संघ व्यवस्थापक पदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.