Breaking News

प्रवरासंगम येथे जिर्णोद्धार केलेल्या मारुती मंदिराची पाहणी


प्रवरासंगम (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील मंदिरास श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीमहाराज यांनी नव्याने बांधलेल्या मारुती मंदिराला भेट दिली असता यावेळी ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन मंदिर कामाचे त्यांनी कौतुक केले यावेळी सरपंच सुनील बाकलीवाल, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती सुडके, प्रकाश पांडव, वसंतराव डावखर, प्रा.लक्ष्मण भवार, बाळू महाराज कानडे, बाळू कदम, राहुल पाटील, सागर म्हस्के, अशोक आगळे, किशोर कदम, बाळासाहेब क्षीरसागर, संदीप सुडके, शांतवन खंडागळे, गोविंद आगळे, रमेश ललवाणी,
गणेश थोरात, जया फाजगे, राजू डावखर, राजेंद्र सुडके, नितीन भालेराव, नितीन गायकवाड उपस्थित होते. नव्याने बांधण्यात आलेले मारुती मंदिर हे लोकवर्गणीतून बांधण्यात आल्याने त्यांनी पुढील देखभालीच्या दृष्टीने सूचना केल्या. तसेच योगदान दिल्याबद्दल सरपंच सुनील बाकलीवाल व बाळासाहेब पाटील व इतर ग्रामस्थांचा श्रीफळ देऊन गौरव केला.