Breaking News

नाशिकच्या खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या गाडीचे टायर फुटले

नाशिकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर निघालेल्या शिवसेना नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना खड्ड्यांचा फटका बसला. नाशिकजवळ असलेल्या मुंडे गावानजिक मोठ्या खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान अशा रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले. आदित्य ठाकरे सुखरूप आहेत. पण टायर फुटल्याने आदित्य ठाकरे यांना दुसऱ्या गाडीने नाशिकला जावं लागलं. त्यानंतर ते पुढे मालेगावला निघून गेले.