Breaking News

नगर आरक्षणासंदर्भात महिना अखेरपर्यंत टाटा संस्थेचा अहवाल; केंद्राकडे शिफारस करणार - मुख्यमंत्रीमुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) कडून या महिन्याअखेरच अहवाल मागितला आहे. त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन केंद्र सरकारकडे आरक्षणासंदर्भात शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली, त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार डॉ.विकास महात्मे उपस्थित होते.