Breaking News

जीवन वाया गेल्याच्या गणनेचा दिवस तो वाढदिवस : डॉ. कुमार सप्तर्षी


कुळधरण / प्रतिनिधी । 25
वाढदिवस म्हणजे आपले जीवन किती वाया गेले, त्याची गणना करण्याचा दिवस असतो. एक वर्ष वाढणं म्हणजे आयुष्यातील एक वर्ष कमी होणे. त्यामुळे एकेक दिवस दुसर्‍याला आनंद देण्यात घालवायचा असतो. दुसर्‍यावरील अन्याय दूर केला तरी त्यात आनंद मिळतो. त्यामुळे कित्येकांच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना आत्तापर्यंत 62 वेळा अटक झाली. मात्र त्यातुन आनंदच मिळाला अशा अनुभवांचे कथन डॉ. कुमार सप्तर्षी यांनी त्यांच्या खेड येथील अभिष्टचिंतन सोहळ्यात केले. प्राचार्य चंद्रकांत चेडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
माजी प्राचार्य चंद्रकांत मोरे, एन.बी. मुदनूर, पंचायत समिती सदस्य हेमंत मोरे, आण्णासाहेब मोरे, मारुती सायकर, बाळासाहेब मोरे, सोमनाथ वाघमारे, चौरंग मोरे, कुळधरण ग्रामविकास संघटनेचे नेते अरुण तांबे, धालवडी-राक्षसवाडी सेवा संस्थेचे चेअरमन मोहन सुपेकर, बंटीराजे जगताप, बंडू सुपेकर, नाथा पाटील, सुधीर जगताप आदी मान्यवर तसेच शैक्षणिक संकुलातील सर्व सेवक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरुपातील बक्षिसे गौरवचिन्ह तसेच प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक विकास कुलकर्णी यांनी केले.डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यामुळे जीवनाला दिशा मिळाली. कुटुंब सुसंस्कारित झाले. या ऋणातून मुक्त होण्यासाठी होण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक मालोजी काकडे, आण्णासाहेब मोरे, सोमनाथ वाघमारे, हेमंत मोरे, अरुण तांबे, सुरेश पवार यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रा. किरण जगताप यांनी केले. माजी पं.स. सदस्य आण्णासाहेब मोरे यांनी आभार मानले.