गिर्यारोहकांचा गट विमा काढण्याला प्राधान्य - विनोद तावडेमुंबई : अपघातात अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढणे आणि अपघातातील मृतांचे मृतदेह बाहेर काढून त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचे काम गिर्यारोहक आपल्या जीवाची बाजी लावून करीत असतात. अशा जिगरबाज गिर्यारोहकांचा गट विमा असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. येणाऱ्या काळात विविध विमा कंपन्यांशी चर्चा करुन गिर्यारोहकांचा गट विमाकरण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.

मागील आठवड्यात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात बस अपघात झाला होता. या घाटात जवळपास 500 फूट दरीत बस पडली होती. या बसमधील व्यक्तींचे मृतदेह दरीतून वर काढण्याच्या मदत कार्यात महाबळेश्वर, महाड आणि पोलादपूर येथील गिर्यारोहण संस्थांच्या सदस्यांनी निरपेक्ष आणि कर्तव्य भावनेतून काम केले. आज त्या गिर्यारोहकांचे पुस्तक देऊन कौतुक क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. यावेळी क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाचे अधिकारी यांच्यासह सह्याद्री मित्र, यंग ब्लड ॲडव्हेन्चर्स,महाबळेश्वर ट्रेकर्स,सह्याद्री ट्रेकर्स यांच्यासह ट्रेकर्स ग्रुप उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget