नागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही


टिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागात हलवण्याची पाळी आली असून या परीसरात नाग व घोणस या जातीच्या सापांची संख्या मोठया प्रमाणात वाढली असल्याने नागरीकात घबराट निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षापूर्वी टिळकनगरचे सर्पमित्र औटी यांचा नागपंचमीच्या दिवशीच मृत्यू झाला होता. तर झंडू कदम यालाही साप पकडताना झालेल्या सर्पदंशाने दोन-तीन महिने अतिदक्षता विभागात ठेवण्याची पाळी आली होती. नुकतेच पंधरा दिवसापूर्वी परीसरातील शंकराच्या मंदिरात नाग निघाल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या परंतू त्यास धार्मिकतेचा रंग मिळाल्यामुळे दैवी चमत्कार म्हणून अनेकांनी त्या नागाचे मनोभावे दर्शन घेतले होते. तसेच हनुमानवाडी परीसरात राहणारे रंजन साळवी यांच्या माश्यांच्या तळ्यात नागाचे पिल्लु आढळले होते. त्यामुळे या परीसरात नागीण व्याली असल्याच्या घटनेस दुजोरा मिळत आहे. परंतु आता विषारी सापांमुळे नागरीकांचे जीवणच धोक्यात आल्याने याबाबत कठोर उपाययोजना करावी अशी मागणी नागरीकांतर्फे करण्यात येत आहे.
टिळकनगर (हनूमानवाडी)येथील रहीवासी संतोष प्रेमचंद अलिगुंडे ( वय 40) हा इसम नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी सातचे सुमारास आडबाजुला असलेला लाईट चालू करण्यास गेला असता त्यास विषारी सापाने दंश केला. त्यास तातडीने सेंट लुक हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. विषाचा परीणाम त्याचे मुत्रपिंडावर झाल्याने त्यांना पुुढील उपचारासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्ट या रूग्नालयात हलविण्यात आले असून त्याचा एक पाय हालचाल करत नसल्याचे रूग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. संतोष अलिगुंडे या साप चावलेल्या रूग्णास श्रीरामपूर येथील सेंट लुक हॉस्पीटल मध्ये दाखल केले असता स्नेक एन्टीवेनीन या इंजेक्शनचे एकून 16 इंजेक्शन द्यावे लागले. सदरचे इंजेक्शनची हॉस्पीटलची किंमत 1000 रू.असून त्याबदल्यात सरकारी रूग्णालयात विनाशुल्क हे इंजेंक्शन मिळते. खाजगी दवाखान्यांना वापरण्यात आलेल्या इंजेक्शनच्या बदल्यात तेवढेच इंजेक्शन आणून द्यावे लागतात. सदरचे इंजेक्शन प्राथमिक आरोग्य केंद्रात, खाजगी दवाखान्याच्या पत्रानूसार रूग्णांना मोफत दिली जात असली तरी केवळ दोनच इंजेक्शन दिली जातात. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना निमगाव खैरी, टाकळीभान, बेलापूर, वाकडी आदी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून गोळा करावे लागते.त्यात त्यांचा वेळ जातो. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे रूग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यात येत होते. तर काही कर्मचारी इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगत होते. यामुळे रूग्णांच्या नातेवाईकाची संभ्रमावस्था व इजेक्शन मिळवण्यासाठी फरफट झाली होती. या रूग्णालयास राज्य सरकारकडून कायाकल्प योजनेंतर्गत राज्यातील प्रथम क्रमांकाचे 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकांनी पुरस्काराची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत येणारे जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय या पुरस्कारासाठी नामांकन दाखल करतात ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील श्रेणीमध्ये श्रीरामपूरने बाजी मारली. जिल्हा व राज्य पातळीवरील आरोग्य पथकाने वर्षभरात 3 वेळा रुग्णालयाची पाहणी करून मूल्यांकन केले. त्यानंतर पुरस्काराची घोषणा झाली. राज्य स्तरावरील पथकाने केलेल्या पाहणीत श्रीरामपूर रुग्णालयास 99 टक्के गुण मिळाले होते ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता, टापटीप, अद्ययावत आरोग्य सुविधा व सेवा देणारे कर्मचारी, अधिकारी, डाॅक्टर्स, परिचारिका याचेही महत्त्वाचे योगदान असल्याने या रुग्णालयाचा दिवसेंदिवस नावलौकिक वाढत चालला आहे.ज्या रूग्णालयात जिवणावश्यक औषधे वेळेवर उपलब्ध नाहीत, असे सांगीतले जाते ते रूग्णालय फक्त दिखाव्यासाठी आहे काय? असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

 घरगुती उपाय न करता सर्पदंश झालेल्या रूग्णाला तातडीने रूग्णालयात हलवावे - डॉ.सचीन कांबळे
सध्या पावसाचे दिवस असल्याने सापांच्या बिळात पाणी शिरत असल्याने व या पावसाळी काळात बेडकांची संख्या वाढत असल्याने भक्षाच्या शोधात साप बाहेर पडत असून नागरीकांनी संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे , तसेच पायात बुट घालणे गरजेचे असून,या काळात अडगळणीच्या जागेत हात घालणे व जाणे टाळावे. तसेच गावठी उपाय व घरगुती उपाय न करता तातडीने विष बाधीत व्यक्तीला रूग्नालयात हलवावे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget