Breaking News

इनरव्हील क्लब ऑफ अ.नगरने दत्तक घेतलेल्या अयोध्या नगरमधील मनपा शाळा क्र.२३ च्या कायापालटाचा शुभारंभ

इनरव्हील क्लब ऑफ अ.नगरच्या अध्यक्षा गीता गिल्डा यांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत केडगाव, अयोध्यानगर येथील मनपा शाळा क्र.२३ दत्तक घेतली असून या शाळेचा संपूर्ण कायापालट करून ही शाळा आनंदी व विदयार्थ्यांचे उज्वल भविष्य बनविण्याचा संकल्प सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने केला आहे. त्यासाठी क्लबच्या माध्यमातून शाळेला खेळाचे साहित्य, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, फर्निचर व पर्यावरण रक्षणासाठी कचरा निर्मूलनाचे साहित्य नुकतेच भेट देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मनपा शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी संजय मेहेर सर, सुपरवायझर पठाण, अध्यक्षा सौ. गीता गिल्डा सचिव वंदना पंडीत, कांता चंगेडीया, भारती शेवते, लक्ष्मी काळे, गायत्री पित्रोडा, सुजाता गांधी, मुख्याध्यापिका सुवर्णा लांडगे, राजळे सर उपस्थित होते. यावेळी श्री.मेहेर म्हणाले कि, इनरव्हील सारख्या संस्थांनी पुढाकार घेतल्याने मनपा शाळेचे रूपच बदलणार असून विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. समाजातील प्रत्येक सामाजिक संस्थांनी शाळा दत्तक प्रकल्प राबविला तर नगर शहरातील शाळा व मुलांना उज्वल भवितव्य निश्चितच लाभेल. अध्यक्षा सौ.गीता गिल्डा यांनी सांगितले कि, क्लबच्या सदस्यांचे सहकार्य व योगदानामुळे प्रकल्प राबविणे शक्य झाले. यापुढेही मिळणाऱ्या सहकार्यातून समाजाला प्रेरणा व उर्जा देणारे उपक्रम राबविले जातील.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमात स्वागत सचिव वंदना पंडित यांनी केले तर आभार कांता चंगेडीया यांनी मानले.