Breaking News

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक मुंबईत करणार- मुख्यमंत्रीमुंबई : भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी देशासाठी जगले. प्रधानमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम अजोड होते. त्यांच्या कार्यातून आणि व्यक्तिमत्वातून प्रेरणा मिळावी यासाठी अटलजींचे भव्य स्मारक मुंबई येथे उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

एन.सी.पी.ए.च्या सभागृहात झालेल्या श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यमंत्री मंडळातील सदस्य, खासदार, आमदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.