सकल मराठा-धनगर-मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन


नेवासा (प्रतिनिधी) - मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा शहरात रविवार पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी अनिल ताके यांनी दिला. मराठा,धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण प्रश्‍नावर शुक्रवारी समाज बांधवांनी नेवासा तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढल्यानंतर आता रविवार पासून नेवासा शहरातील श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्‍वर गणपती चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. हे ठिय्या आंदोलन बेमुदत असल्याचे सकल मराठा समाजाचे अनिल ताके यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
रविवारी सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनामध्ये अनिल ताके, भाऊसाहेब वाघ, संभाजी माळवदे, दीपक धनगे, बाळासाहेब कोकणे, अशोक कोळेकर, युफुस बागवान, राजेंद्र उंदरे, अभिजित मापारी, संदीप गाडेकर, देविदास जगताप, गणेश कोरेकर, विशाल सुरडे, असिफ पठाण, कल्पेश बोरकर हे मुख्य आंदोलक असून त्यांना पाठींबा देण्यासाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक काकासाहेब गायके,जितेंद्र कुर्‍हे, संदीप बेहळे, अंबादास ईरले, फारुकभाई आतार, भाजपचे माजी शहराध्यक्ष पोपटराव जिरे, जानकीराम डौले, किशोर ठाणगे, भाजपचे जिल्हा चिटणीस नामदेवराव खंडागळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार,मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश झगरे, नारायण लोखंडे,धनंजय डीके, कानिफराजे डीके, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अँड.संजीव शिंदे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget