Breaking News

बूथ कमिटीच्या माध्यमातून राष्ट्रवादी सत्ता संपादन करणार : कोते


जामखेड शहर प्रतिनिधी

बूथ कमिट्या याच सत्तेचा राजमार्ग ठरणार आहेत. भाजपाने पैशाचा दुरुपयोग करून सत्ता मिळवली आहे. आता तरुणांचा भ्रमनिरास करत सहकार व शेती उद्योग मोडीत काढण्याचे काम सुरू केले आहे. सत्तेचा व प्रशासनाचा गैरवापर सुरू आहे. त्यामुळे भाजपाला रोखण्यासाठी तरूणांची आक्रमक फळी उभी केली जाईल. बूथ कमिटीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता संपादन करील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केले.

जामखेड येथे आज {दि. २५ } राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बूथ कमिटी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव स्वप्नील घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवक जिल्हाध्यक्ष कपील पवार, राजेंद्र गुंड, नरेंद्र जाधव, काकासाहेब तापकीर, मधुकर राळेभात, दत्ता वारे, संजय वराट, शरद भोरे, अमित जाधव, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, सखाराम भोरे, शरद शिंदे, नितीन हुलगुंडे, विकास राळेभात, पवन राळेभात, अवधूत पवार, अमोल गिरमे, मयुर डोके, सुरेश भोसले, भगवान गीते, विजयसिंह गोलेकर, नितीन पाटील, हनुमंत पाटील, अनिल बाबर, संजय कोळगे, काकासाहेब चव्हाण आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोते म्हणाले की, भाजपाने केवळ सोशल मिडियाचा वापर करून सत्ता मिळविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही सोशल मीडिया योग्य वापरासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. भाजपाला याद्वारे जशास तसे उत्तर दिले जाईल. भाजपा सरकार मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण देणार नाही फक्त घोळवत ठेवणार आहे.

जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले की, प्रा. राम शिंदे हे मंत्री आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी रस्त्यासाठी मंजूर केल्याचे सांगतात. पंरतु मतदारसंघातील रस्त्यांची चाळणी झालेली आहे. सगळीकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. मग निधी जातो कुठे? मतदार संघात विकास कामे शुन्य आहेत. येणाऱ्या निवडणुकीत या निष्क्रिय मंत्र्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक पळता भुई थोडी करणार आहेत. सूत्रसंचालन नरेंद्र जाधव यांनी केले. मयुर डोके यांनी आभार मानले.