Breaking News

धनश्री विखेंना लाभला अनाथ चिमुकल्यांचा आनंद


राहुरी प्रतिनिधी

चिमुरड्यांचे विविध खेळ, बालगितांचा येणारा मंजूळ आवाज, स्‍नेहभोजन, अनाथ मुलांना शालेय साहित्‍यांचे वाटप असा विविधांगी उपक्रम लोणी येथील ब्रिलियंट बड्रर्स प्रि‍ स्‍कूल व नर्सरी या स्‍कुलच्‍यावतीने गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय व अनाथालया राबविण्यात आला. स्‍कुलच्‍या संचालिका धनश्री विखे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यानिमित्ताने धनश्री विखे यांनीही या अनाथांमध्‍ये व स्‍कुलच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये सहभागी होऊन या मुलांसह खेळण्‍याचा व भोजनाचा आनंद घेतला.

विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे आणि जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनी विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली चिमुरड्यांसाठी ब्रिलियंट बड्रर्स प्रि‍ स्‍कूल आणि नर्सरी लोणी येथे सुरु करण्‍यात आलेले आहे.

यावेळी बोलताना धनश्री विखे पाटील म्‍हणाल्‍या, विद्यार्थ्‍यांमध्‍ये बालपणापासूनच सामाजिक जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. त्‍यातून सामाजिक एकीकरणाची भावना विकसित होण्‍यास मदत होईल. या अनुषंगाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यावेळी पंचायत समितीचे सभापती ओहोळ, प्राचार्य किरण चेचरे, शिक्षिका रुपाली सगट, भक्‍ती जेजुरकर, पूनम कुटे आदी शिक्षकही या विद्यार्थ्‍यांच्या आनंदात सहभागी झाले.