भिवंडी महापालिकेत लिपिक बनला नगरसचिव


भिवंडी : भिवंडी पालिकेच्या मूळ आस्थापनेवर लिपिक पदावर कार्यरत असलेले अनिल प्रधान यांना थेट विधी अधिकारी व नगर सचिव या पदाचा प्रभारी कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. शासनाचे नियम डावलून हा पदभार त्यांच्याकडे सोपवून पालिका प्रशासनाने शासकीय नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला विधी व नगरसचिवाचा अतिरिक्त कार्यभार त्वरित काढून घेण्यात यावा व त्यांना मूळ पदावर पाठवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते संजय म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.. महापालिकेमध्ये बिंदू नामावली व शासन नियमावलीप्रमाणे शासकीय अधिकारी कार्यरत नसल्यामुळे आयुक्त मनोहर हिरे यांनी स्वत:चे अधिकार वापरत १ ते ५ प्रभागात पात्रता नसताना लिपिकांना सहाय्यक आयुक्तपदाचा (प्रभाग अधिकारी ) म्हणून नियुक्त केलेले आहेत. तसेच बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना निलंबित केल्याने बांधकाम विभागातही गोंधळ उडाला असून शहरातील रस्ते दुरुस्त करण्याबाबत फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget