Breaking News

स्क्वॅशमध्ये दिपीका पल्लीकल व जोश्ना चिनप्पाने उघडले खाते


जकार्ता वृत्तसंस्था

आशियाई खेळांच्या सातव्या दिवशी भारताने स्क्वॅशमध्ये पदकाची कमाई करत आपलं खातं उघडलं आहे. दिपीका पल्लिकलला उपांत्य सामन्यात हार पत्करावी लागली. स्क्वॅशमधलं भारताचं हे पहिलं पदकं ठरलं आहे.भारताच्या दीपिका पल्लीकलला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीच्या लढतीत तिला अव्वल मानांकित निकोलडेव्हीडकडून पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर भारताची जोश्ना चिनप्पा हिनेही याच प्रकारात कांस्यपदक मिळवले. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत दीपिका वजोश्ना यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदकाची वेस ओलांडता आली नाही. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला स्क्वॉशपटूंनी एकेरीत दोनपदक जिंकण्याचा पराक्रम केला. पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित मलेशियाच्या निकोल डेव्हीडने 3-0 अशा फरकाने दीपिकाला पराभूत केले. जोश्नाला चिवटझुंज देऊनही मलेशियाच्या 19 वर्षीय शिवसांगरी सुब्रमण्यमने 3-1 अशा फरकाने नमवले. त्यामुळे दोन्ही भारतीय खेळाडूंना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दीपिका ही2014च्या आशियाई स्पर्धेत एकेरीत पदक जिंकणारी एकमेव भारतीय होती. आशियाई स्पर्धेतील दीपिकाचे हे सलग चौथे पदक आहे. दीपिकाचे आशियाई स्पर्धेतील हे दुसरेकांस्यपदक आहे. तिने 2014मध्येही कांस्यपदक जिंकले होते. जोश्नाचे हे एकेरीतील पहिलेच पदक ठरले. यापूर्वी तिने महिला सांघिक गटात एक कांस्य व एक रौप्यपदक जिंकलेआहे.

चौकट

एक दृष्टिक्षेप

बॉक्सिंग - (महिला) बॉक्सर पवित्राची पाकिस्तानच्या परविना रुख्सानावर मात

तिरंदाजी - (पुरुष) कोरियाची भारतावर ५-१ ने मात

बॅडमिंटन - (महिला दुहेरी) आश्विनी पोनाप्पा - एन. सिकी रेड्डी जोडी चिनी प्रतिस्पर्धी जोडीकडून पराभूत

बॅडमिंटन - (महिला)

पी.व्ही.सिंधूची इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्कावर २१-१२, २१-१५ ने मात, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

अॅथलेटिक्स- सी. बालसुब्रमण्यम उंच उडीच्या अंतिम फेरीत दाखल

तिरंदाजी - (महिला)

उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिलांचा संघ चीन तैपेईकडून २२१-२०८ ने पराभूत

बॅडमिंटन - (महिला)

सायना नेहवालची उपांत्यपूर्व फेरीत धडक, इंडोनेशियाच्या २१-६, २१-१४ ने मात