Breaking News

लाभार्थ्‍यांना घरांची उपलब्‍धता : डॉ. विखे


लोणी प्रतिनिधी

शिर्डी मतदारसंघात घरकुल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करुन लाभार्थ्‍यांना घरांची उपलब्‍धता करुन देणार आहोत, अशी ग्वाही पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्‍याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, ज्‍या लाभार्थ्‍यांना जागा उपलब्‍ध होणार नाही अशा लाभार्थ्यांना जागेची उपलब्‍धता करुन देऊन पदमभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांच्‍या नावाने घरकुल योजना सुरु करण्‍याचा मानस आहे. राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार राहुल कोताडे, पंचायत समितीच्या सदस्या नंदा तांबे, मुळा प्रवरेचे संचालक देवीचंद तांबे, विखे पाटील कारखान्याचे संचालक अशोक गाडेकर, माजी सभापती प्रल्हाद बनसोडे, सरपंच पुनम तांबे, माजी सरपंच गोरक्षनाथ तांबे, सुनिल तांबे, विजय तांबे, श्रावण वाघमारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.