लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब


नवी दिल्ली : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना बुधवारी राज्यसभा आणि लोकसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. करुणानिधी हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यांनी पाचवेळा तामिलनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या जाण्याने देशने एक सक्षम प्रशासक आणि एक उत्कृष्ट राजकीय नेता गमावला आहे, सभागृह त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करते. असे राज्यसभा सभापती वंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. यानंतर राज्यसभेत करुणानिधी यांना आदरांजली अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget