Breaking News

विद्यार्थ्यांचे वाढदिवस पुस्तकभेटीतून साजरे व्हावेत : विखे


राहाता प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांचे वाढदिवस चॉकलेट गोळ्या देवून साजरे करण्यापेक्षा पुस्तकांच्या भेटीतून साजरे व्‍हावेत, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी व्यक्त केली.

तालुक्यातील पिंप्रीनिर्मळ येथे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीच्यावतीने सुमारे ४ लाख रुपयांचे साहित्य देण्यात आले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. विखे म्हणाल्या, खासगी शाळांच्या बरोबरीने आता जिल्हा परिषद शाळांचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वाढलेली पटसंख्या ही खऱ्या अर्थाने साध्य केलेल्या गुणवत्तेचे द्योतक आहे. या कार्यक्रमास स्‍थानिक संस्‍थांच्‍या पदाधिका-यांसह ग्रामस्‍थ, शिक्षक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.