वॅफ कुमार फुटबॉल स्पर्धा भारतीय 'कुमारां'चा इराकला 'दे धक्का'
जॉर्डन वृत्तसंथा
 पश्चिम आशियाई फुटबॉल महासंघाच्या (वॅफ) १६ वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारतीय कुमार संघाने कुशल कामगिरीच्या जोरावर आशियाई विजेत्या इराकवर - असा विजय मिळवला. भारतीय फुटबॉलसाठी कालचा दिवस धक्कादायक विजयांची नोंद करणारा ठरला. एकीकडे भारतीय युवा संघाने अर्जेटिनाला धूळ चारली, तर भुवनेशने शेवटच्या मिनिटाला हेडरद्वारे केलेल्या गोलमुळे भारताने कोणत्याही फुटबॉल स्पर्धेत तसेच कोणत्याही वयोगटात प्रथमच इराकवर मात केली.
  एएफसी पात्रता फेरीत (१६ वर्षांखालील) यापूर्वी भारत इराक एकमेकांसमोर आले होते. यापूर्वीच्या लढतीत जपानविरुद्ध भारताला - असा पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. अखेरीस भुवनेशने गोल करताच संपूर्ण भारतीय संघाने मैदानावर धाव घेतली विजयाचा जल्लोष केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget