Breaking News

जनतेच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम : काळे


कोपरगाव श. प्रतिनिधी :

तालुक्यातील जनतेने ज्याप्रकारे माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे, माजी आ. अशोक काळे यांच्यावर मनापासन प्रेम केले, त्याच प्रेम आणि आशिर्वादाची यापुढे अपेक्षा राहिल. जनतेने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास कधीही सक्षम आहे, असा आत्मविश्वास युवा नेते आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

येथील व्यापारी धर्मशाळा येथे युवा नेते काळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठया दिमाखदार सोहळ्यात पार पडला. तालुक्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी मोठी उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी काका कोयटे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, अशोक रोहमारे, जि. प. सदस्य राजेश परजणे, राजेंद्र जाधव, व्यापारी महासंघ, ज्येष्ठ नागरिक संघ, लायन्स क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन, वकील बार असोसिएशन, सकल मराठा समाज, सकल जैन समाज, सकल मुस्लिम समाज, नाभिक समाज सेवा संघ, माळी समाज सेवा संघ, परीट समाज सेवा संघ, मातंग समाज सेवा संघ, धनगर समाज सेवा संघ, कहार समाज सेवा संघ, इंजिनीअर्स असोसिएशन, कोपरगाव भाजी विक्रेता संघ, मार्केट कमिटी व्यापारी, हमाल-मापाडी संघ, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, नगरपालिका कर्मचारी संघटना, एस. टी. कामगार संघटना, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ, प्राध्यापक-शिक्षक कर्मचारी संघटना तसेच कोपरगाव तालुका आणि शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, धार्मिक, कला-क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.