पेट्रोलच्या किंमतीने गाठला दोन महिन्यातील उच्चांक

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून इंधन दरवाढ कमी होण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचा दावा केला जात असताना सलग सोमवारी चौथ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किंमतीत 12 पैशांनी वाढ झाली असून पेट्रोलच्या दराने दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 12 पैशांनी वाढले असून ते 84.41 रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेलचे दर 13 पैशांनी वाढले असून आता ग्राहकांना प्रति लिटर डिझेलसाठी 72.66 रूपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान इंधन दरवाढीचा फटका हा देशाला बसला असून मागच्या दोन महिन्यात सोमवारचे पेट्रोलचे दर हे सर्वाधिक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर झाला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे 76.97 रूपये आणि 68.44 रूपये आहेत. दिल्लीत सोमवारी महाग दराने पेट्रोल विकले जात आहे. याआधी 9 जून रोजी पेट्रोलची किंमत ही अधिक होती. कोलकातामध्ये प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर हे अनुक्रमे 79.89 रूपये आणि 71.22 रूपये आहेत. तर चेन्नईमध्ये 79.96 रूपये पेट्रोल तर 72.29 रूपये एवढा डिझेलचा दर आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget