मित्रपक्षांना महत्व !

आगामी लोकसभा निवडणूकांना सामौरे जाण्यासाठी सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी आप आपली रणनिती आखायला सुरूवात केली आहे. निवडणूकांचे निकाल हाती आल्यानंतर, पंतप्रधान पदांचा उमेदवार ठरविता येईल, अशी भूमिका घेऊन काँगे्रसने एक पाऊल मागे येत, घटकपक्षांना सोबत घेण्यावर भर दिला आहे. नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी निवडणूकांना सामौरे जाण्यासाठी देश पिंजुन काढण्याची माझी तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्याला पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही असे देखील त्यांनी एका मुलाखतीत सुचित केले. तसेच राष्ट्रव्यापी आघाडीऐवजी, राज्यस्तरावर एकत्र येण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता देखील पवार यांनी व्यक्त केली. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी आणि देवेगौडा यांच्यासह देश पिंजून काढण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. मला पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही, सोनिया गांधी व देवेगौडा यांनाही तशी आस नसावी, असे मला वाटते. त्यामुळे आम्ही तिघे देश पिंजून काढू. जेणेकरुन भाजपला सक्षम पर्याय असल्याचा विश्‍वास लोकांना वाटेल, असे पवार यांनी म्हटले. वास्तविक पाहता पवारांची पंतप्रधान पदांची सुप्त इच्छा लपून राहिलेली नसली, तरी त्यांना वास्तविकतेचे भान आहेत. त्यामुळे विरोधक भाजपाच्या विरोधात एकत्र येत तिसरा पर्याय देऊ शकतात अशी चर्चा जोर धरू लागली आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून विरोधकांचा प्रभाव काही पडत नव्हता, त्यामुळे अनेकजण विरोधकांना निष्क्रिय संबोधून विरोधकांची हेटाळणी करायचे, मात्र मागील सहा महिन्यात जर देशभरातील राजकारणांचा बाज बघितला असता, विरोधक सहा महिन्यापासून सक्रिय झाल्यामुळे पुढीन निवडणूका या सोप्या नाहीत, हे एव्हाना भाजपला देखील कळून चुकले आहे. त्यातच विरोधकांनी घटक पक्षांची मोट बांधण्यास सुरूवात केली, असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. अनेक मित्रपक्ष देखील आता स्वबळावर लढण्याची भाषा करू लागले आहे. त्याची सुरूवात शिवसेनेपासून झाली असून, तेलगु देसम चे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी देखील स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे. अर्थात भाजपसोबत असलेले मित्रपक्ष आता स्वबळांची भाषा करू लागले आहे. त्यामागे अनेक कारण आहेत. लोकसभेत भाजपचे बहूमत असले, तरी राज्यसभेत अद्यापही भाजपला बहूमत मिळवता आलेले नाही. त्यामुळे भाजपला मित्रपक्षांची गरज आहे. मात्र तरीही भाजपची बदलती भूमिका, ठोस निर्णयांचा अभाव, जातीय दंगे, ते रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे कडव्या हिंदुत्ववादी भूमिका भाजप घेत असल्याची होणारी टीका यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळेच राजकीय सूर बदलत चालला असून, भाजपविरोधी वातावरण तयार होवू लागले आहे. अशापरिस्थितीत भाजपपासून मित्र पक्ष दूरावत चालले आहे. तर दुसरीकडे घटक पक्ष काँगे्रसकडे ओढ घेतांना दिसून येत आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला असून, संविधान बचाव, हल्लाबोल आंदोलनामुळे, विरोधकांचा जनतेसोबत सुरू असलेला सुसंवाद आणि सत्ताधार्‍यांचा कारभार कसा अनागोंदी सुरू आहे, याचे वास्तवदर्शी चित्रण यामुळे सर्वसामान्य माणूस विचार करू लागला आहे. राज्यात असो किंवा केंद्रात शेतकर्‍यांविषयी ठोस निर्णय घेण्याची क्षमता केंद्र सरकार किंवा राज्य सरकार दाखवू शकलेले नाही. कासवगंज येथील जातहीय दंगली, घडवण्यामागे कोण आहे? प्रशासन ठोस भूमिका का घेत नाही. असे असंख्य प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य तिसर्‍या पर्यांयाच्या शोधात असणार हे नक्की. मात्र तसा तिसरा पर्यांय येणार्‍या काळात समोर येईल का? अन्यथा भाजप आणि काँगे्रसव्यतिरिक्त अन्य पर्यांय सर्वसामान्यांकडे नसेल. यावरही चर्चा आता झडू लागल्या आहेत. मात्र पुढील निवडणूकांचा काळ जवळ आला आहे, अशावेळी देशात राजकीय पातळीवर बरीच उलथापालथ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget