Breaking News

शहरटाकळी विद्यालयात मुलांनी बनवल्या ईको फ्रेंडली राख्या


भाविनिमगाव प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी विद्यालयात पर्यावरण पुरक राख्या बनवने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य गणपत शेलार यांच्या कल्पनेतील टाकावू वस्तूपासुन पर्यावरण पुरक राख्या बनवण्यासाठी विद्यालयातील 5वी ते 9 वी इयत्तेच्या 54 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यालयाचे कलाशिक्षक शितलकुमार गोरे यांनी मुलांना राखी बनवण्याचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. कार्यशाळेत राख्या बनवण्यासाठी मुलांनी लोकर, दोरा, कागद, कापड व इतर टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकर्षक व सुंदर राख्या बनवल्या. अत्यंत कमी वेळ व खर्च करून बनवलेल्या या राख्या रक्षाबंधनाला आम्ही वापरून सण साजरा करणार असल्याचे यावेळी मुलांनी सांगितले. विद्यालयाच्या शिक्षिका अलका भिसे व रेखा आढाव यांनी मुलांना राखी बनवण्यासाठी सहकार्य केले.