Breaking News

छगन पानसरे यांना एम.फिल प्रदान


शेवगाव / ता. प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून छगन भिकाजी पानसरे यांना मराठी विषयात एम.फिल् पदवी प्रदान करण्यात आला असून, त्यांनी शेवगाव तालुक्यातील उखाणे म्हणी वाक्प्रचार यासंदर्भात चिकित्सक अभ्यास करून तसेच ग्रामीण भागात जावून, या संदर्भात अभ्यास करून पेमराज सारडा महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. महेश्‍वरी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला. त्यांनी या विषयासंदर्भात अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केल्यामुळे या विषयातून त्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे, त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.