Breaking News

औषध विक्रेत्यांचा 28 सप्टेंबरला संप


मुंबई : ई-फार्मसीविरोधात 28 सप्टेंबरला पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात देशभरातील फार्मासिस्ट सहभागी होणार आहेत; मात्र राज्यातील फार्मासिस्ट काळ्या फिती लावून कामावर हजर राहून निषेध नोंदवतील. ई-फार्मसीमुळे औषधे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, अशी भीती फार्मासिस्ट संघाकडून व्यक्त होत आहे. औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना मिळायला हवीत, असा मुद्दा संघाने मांडला आहे. त्यामुळे सरकारच्या मसुद्याला विरोध करण्यासाठी राज्यातील फार्मासिस्ट 21 ते 28 सप्टेंबरपर्यंत काळ्या फिती लावून निषेध नोंदवतील, अशी माहिती महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनच्या कैलास तांदळे यांनी दिली.