केसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या


ठाणे : प्रतिनिधी 
आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत्महत्या करणे अशा घटना घडतात. दरम्यान ठाण्याच्या कापूरबावडी परिसरात मात्र शाळेत जाणार्‍या 13 वर्षाच्या मुलीच्या आईने केसाला जास्त तेल लावल्याच्या रागातून इमारतीच्या 7 व्य माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अपघाती निधनाची नोंद करण्यात आली आहे. 
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्रम्हांड परिसरात राहणारी 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी विजया भोईर हि ठाण्याच्या सेंट झेवियर्स शाळेत इयत्ता आठवीत शिकत होती. गुरुवारी सकाळी 6-15 वाजण्याच्या सुमारास विजया शाळेत जाण्यासाठी उठली. शाळेत जाण्यापूर्वी तिच्या आईने तिच्या डोक्यावर जास्त तेल लावले. जास्त तेल लावणे विजयला आवडत नव्हते. त्यामुळे तिने आईशी भांडणे केली आणि ती रडू लागली. दरम्यान विजयाच्या आईने किचनमध्ये तिचा टिफिन बांधण्यासाठी गेली असता विजयाने इमारतीच्या तिच्या राहत्या 7 व्य माळ्याच्या गेलेरीत आली आणि नैराश्येतून तिने खाली उडी घेऊन जीवन यात्रा संपवली. झालेल्या आवाजाने विजयाच्या आईला फांद्या तुटल्याहा भास झाला मात्र सुरक्षारक्षकाने केलेल्या आरडाओरडाने आई गेलेरीत आली आणि तिची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दृश्य दिसले. मृतक विजयाचे वडील हे बांधकाम व्यावसायिक आहेत. विजयाच्या या आत्महत्येच्या घटनेने मात्र परिसरात शोककळा पसरली असून कापूरबावडी पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक भानुशाली अधिक तपास करीत आहेत. सेंट झेविअर्स शाळेत तिला कुणी चिडवायचे का याबाबत पोलीस चौकशी करीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget