Breaking News

स्वाईन फ्ल्यूने सातार्‍यातील महिलेचा मृत्यू


सातारा (प्रतिनिधी) : स्वाईन फलूने सातारा शहर आणि परिसरात थैमान घातले असून पहाटे आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. गेल्या पंधरवड्यात स्वाईन फलूने घेतलेला हा पाचवा बळी आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तेव्हापासून सातारा शहरात अनेकांना स्वाईन फलूची लागण झाली आहे. त्यामुळे आनंदा ज्ञानू इंगळे (वय 50, रा. सैदापूर), अर्चना बोपर्डेकर (वय 52, रा. कोडोली), महेंद्र तपासे (वय 30, रा. मल्हारपेठ) व नितीन मधुकर जाधव (वय 40, रा. शाहूपुरी) यांचा मृत्यू झाला हेाता. चार दिवसांपूर्वी रेश्मा अस्लम शेख (वय 43, रा. तेलीखड्डा, शनिवार पेठ, सातारा) यांना थंडी, ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे.