Breaking News

शिक्षणाची पाळेमुळे रुजवणारा सहकाराचा मार्गदर्शक हरपला : मोहिते


श्रीगोंदा प्रतिनिधी

तालुक्यात सहकाराची आणि शिक्षणाची पाळेमुळे रुजवणारा सहकाराचा मार्गदर्शक हरपला, अशी आदरांजली स्व. शिवाजीराव नागवडे यांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांनी वाहिली. हजारो पदाधिकारी, आजी माजी मंत्री, आमदार, खासदार आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्व. शिवाजीराव (बापू) नागवडे यांना आज दि. २० अखेरचा निरोप देण्यात आला.

नागवडे कारखान्याचे संस्थापक माजी आमदार आणि राज्य साखर संघाचे अधेक्ष स्व. शिवाजीराव नागवडे यांना वांगदरी या त्यांच्या गावी हजारो कार्यकर्ते आणि राज्यातील नेते मंडळींच्या उपस्थितीत त्यांचे पुत्र, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी अग्नी दिला. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजीमंत्री मधुकर पिचड, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, माजीमंत्री शंकरराव कोल्हे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, माजी खा. दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, आ. राहुल जगताप, आ. सुरेश धस, आ. स्नेहलता कोल्हे, आ. राहुल कुल, माजी आ. पांडुरंग अभंग, सभापती पुरुषोत्तम लगड, जिल्हा कांग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, काळे कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, चंद्रराव तावरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, घोड गंगा कारखान्याचे चेअरमन माजी आ. अशोक पवार, डी. एम. कांबळे, नगरसेवक सुरेंद्र गांधी आदींनी नागवडे बापूंच्या आठवणीला उजाळा देत श्रद्धांजली समर्पित केली. दरम्यान, ‎स्व. नागवडेंच्या अंत्यविधीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, सहायक पोलिस प्रमुख मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ, सहायक पोलिस निरीक्षक बोडके यांनी बंदोबस्त लावून अंत्यविधी आणून रस्त्यात येणारे अडथळे दूर केले. ‎यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच जिल्ह्यातून विविध पक्षाचे कार्येकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ‎नागवडेंच्या निधनामुळे कारखाना परिसर आणि वांगदरी गावात बंद पाळण्यात आला.