Breaking News

केरळ पुरग्रस्तांसाठी परळीकर सरसावले!


परळी वैजनाथ,(प्रतिनिधी): केरळमध्ये पावसाने थैमान घातले होते यात अतोनात नुकसान झाले.जीवित आणि अस्मानी संकटाने हाहाकार माजला. या दुर्दैवी घटनेत संपूर्ण देशांतून व विदेशातून केरळी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. या मध्ये परळीकर ही सरसावले होते. सार्वजनिक निधी संकलन तसेच विविध संस्थांनी पुढे येउन मदतनिधी प्रदान केला. हा संकलीत २ लक्ष रूपये निधी नुकताच केरळ मुख्यमंत्री सहाय्यता कोषात जमा करण्यात आला आहे. परळीकरांना सलाम करावा अशी संवेदना व्यक्त करीत केरळकरीता तब्बल दोन लक्ष रुपये परळीकरांच्या वतीने जमा झाले.परळी शहरातील विविध संस्था आणि व्यापारी, नागरिकांकरवी परळी स्टेट बैंक ऑफ ईंडिया चे शाखाधिकारी सहारे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता कोषात केरळसाठी डिमांड ड्राफ्ट सुपुर्द केले. यावेळी पी .एस. घाडगे, बाजीराव भैया धर्माधिकारी, आयुब पठाण, उत्तम माने,माऊली फड, गोपाळ आंधळे, पवन मुंडे ,आनंत इंगळे, दत्ता सावंत, अतुल दुबे, बंडु आघाव,जयप्रकाश लड्डा, रवी मुळे, धनराज कुरील, श्रीकांत पाथरकर, अरुण पाठक, आनिस अग्रवाल, शंकर कापसे, योगेश पांडकर, धम्मा अवचारे, ऋषिकेश बारगजे, वैजनाथ कळसकर, जितेंद्र नव्हाडे, नंदकुमार बियाणी, शंकर आडेपवार, विजय भोईटे, सचिन जोशी, सचिन गीते, प्रेमनाथ कदम, रामदास कराड, ज्ञानेश्वर होळंबे, बाळासाहेब गायकवाड आदीसह सर्वपक्षीय नेतेगण आणि विविध संस्था पदाधिकारी यांची उपस्थीती होती.