Breaking News

औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी कैस शेख प्रचंड मतांनी विजयी


खुलताबाद/प्रतिनिधी
युवक काँग्रेसच्या पक्षांतर्गत घेण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांच्या निवडणुकीत औरंगाबाद ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कन्नडचे कैस शेख (खाजा सेठ) यांची प्रचंड मतांनी निवड झाली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पक्षांतर्गत होवू घातलेल्या निवडणुकीत औरंगाबाद ( ग्रामीण ) जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पदासाठी औरंगाबाद येथील भारत साठे, सिंधुताई पवार, विशाल लांडगे तसेच सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर, कन्नडचे शेख कैस (खाजा सेठ) हे निवडणूक रिंगणात होते. यापैकी जिल्हा अध्यक्ष पदी अब्दुल समीर, तर जिल्हा उपाध्यक्षपदी शेख कैस (खाजा सेठ) यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला म्हणून अजिम मणियार, नवनिर्वाचित गंगापूर-खुलताबाद विधानसभा अध्यक्ष शेख नईम. लोणी ग्रामपंचायत सदस्य इंद्रिस पटेल, देवळांना ग्रामपंचायत सदस्य नईम शाहा, यांच्यासह जिल्ह्याभरातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला.