Breaking News

सरपंचाला बेदम मारहाण


म्हसवड (प्रतिनिधी) : माण तालुक्यातील गंगोती गावचे विद्यमान सरपंच दादासो तातोबा झिमल यांना माजी सरपंच पोपट शामराव झिमल व इतर तिघांनी सागवानाच्या लाकडाने मारहाण केली. लाकडाला खिळे असल्याने सरपंच रक्तबंबाळ झाले असून पुढील उपचारासाठी सातारा सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गंगोती ग्रामपंचायतची गुरुवारी सकाळी 10 वाजता मीटिंग होती. यावेळी इतर विकास कामांची चर्चा झाल्यावर सप्ताह बसवण्याबाबत चर्चा होऊन बैठक संपवण्यात आली. सरपंच दादासो झिमल हे घरी जात असताना मारूतीच्या मंदिरा जवळ गावातील माजी सरपंच पोपट झिमल व इतर तिघांनी त्यांना अडवले. संशयितांनी सागवाणी लाकडाच्या फळकुट्याने डोक्यावर हातावर मारहान केली. फळकुटाला खिळे असल्याने त्यांचा रक्तस्राव झाला. मारहाणीनंतर सरपंच जखमी अवस्थेत म्हसवड पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी ठाणे अंमलदारानी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचारासाठी पाठवले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.