Breaking News

सर्वच भाषांचा सन्मान करणारा आपला देश एकमेव - भोंडवे


बजाज नगर /प्रतिनिधी
येथीलस्व.भैरोमल तनवानी विद्यालयात हिंदी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे पदाधीकारी तथाउद्योजक हनुमान भोंडवे यांनी वरील विधान केले.तसेच त्यांनी हिंदी जनसामान्यांची मने जोडणारी भाषा आहे.असे सांगितले करीता दैनंदिन कामात हिंदी चा ही वापर करण्याचे आवाहन केले. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे या होत्या. या वेळी विज्ञापन लेखन तसेच पेड़ों का अभाव,प्रदूषण का बढ़ता प्रभाव या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रियंका पाटील हिने तर प्रियंका कर्जतकर द्वितीय व शुभांगी भिसे हिने तृतीय क्रमांक पटकाविला.तर कावेरी रुपेकर व नेहा पवार यांची उत्तेजणार्थ म्हणून निवड झाली. विज्ञापन लेखन मध्ये प्रथम क्रमांक ज्ञानेश्‍वर माने याने तर द्वितीय क्रमांक वैभव कांदे व तृतीय क्रमांक ऐश्‍वर्या लोहार यांनी प्राप्त केला तर रुपेश दंडगे व दीपीका चव्हाण यांची उत्तेजणार्थ म्हणून निवड झाली. महाराष्ट्र हिंदी विद्यालय औरंगाबाद येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत अश्‍विनी वनारसे हिने तृतीय क्रमांक पटकाविला . यावेळी सर्व विजयी विद्यार्थ्यांचा व विषय शिक्षक प्रदीप माळी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ज्ञान भवन स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख वैभव पवार व मेघा इटनकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. हिंदी विषय शिक्षक प्रदीप माळी यांनी सूत्र संचालन केले.तर शारदा पगारे यांनी आभार मानले.