Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार


औरंंंगाबाद : बेगमपुरा परिसरात राहणार्‍या 22 वर्षीय तरूणीवर कुंडलिक शाहु चव्हाण (वय 28, रा.छावणी) याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. कुंडलिक चव्हाण याने पीडितेस 9 जुलै ते 14 सप्टेंबर 2018 दरम्यान विविध ठिकाणी नेवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले होते. पीडितेच्या तक्रारीवरून कुंडलिक चव्हाण विरूध्द छावणी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुुंदरर्डे करीत आहेत.