Breaking News

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ‘‘किसान एम-पे’’ मोबाईल बँकिंग ऍपचा शुभारंभ


सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘किसान एम-पे’ मोबाईल बँकिंग ऍपचा शुभारंभ कार्यक्रम ना. सुभाष देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते, विद्याधर अनास्कर, अध्यक्ष-प्रशासकीय मंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई यांचे अध्यक्षतेखाली तसेच ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा व संचालक सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ऱाजेंद्र सरकाळे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले यामध्ये त्यांनी बँकेच्या विविध कर्ज व ठेव योजनंाची माहिती दिली. बँकेने कोअर बँकिंग प्रणालीद्वारे देत असलेल्या एनईएफटी/आरटीजीएस, एटीएम, पॉज, ईकॉम, सीटीएस आणि मोबाईल बँकिंग सुविधांचा ग्राहकांनी लाभा घ्यावा असे सूचित केले .

बँकेने किसान एमपे या मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ केला आहे ही अत्यंत चांगली बाब असून या सुविधेचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा. अशा प्रकारच्या आधुनिक बँकिंगच्या सुविधा देणार्‍या बँका कमी आहेत ़ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज उत्कृष्ठ असल्यामुळे या बँकेचा नावलौकिक राज्यातच नव्हेतर देश पातळीवर झालेला असून या बँकेचे नाव आदराने घेतले जाते़ राज्यासाठी मॉडेल म्हणून ही बँक कौतुकास पात्र आहे. या बँकेचा एनपीए अत्यंत कमी असून वसुलीचे प्रमाण सतत 100 टक्के असते ही बाब कौतुकास्पद आहे. या बँकेचे कामकाज अत्यंत पारदर्शक असून राज्यातील इतर बँकंानी मॉडेल म्हणून या बँकेचे अनुकरण करावे. कामकाज पारदर्शक असल्याशिवाय सहकार सक्षम होणार नाही. सहकारातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. आपण विश्वस्त म्हणून कामकाज केले पाहिजे. या बँकेसारखे उत्कृष्ठ कामकाज सहकारातील इतर बँकांनी केल्याशिवाय सहकार समृध्द होणार नाही. सहकार क्षेत्रातील व्यवस्थेत बदल केला पाहिजे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होणेसाठी सहकाराशिवाय पर्याय नाही. प्रत्येक गावामध्ये 1 विविध कार्यकारी संस्था असली पाहिजे. तसेच त्यांनी व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अटल पणन योजनेचा विकास संस्थांनी लाभ घ्यावा. विकास सेवा संस्थांचे माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम झाली पाहिजे. खेडे समृध्द झाले पाहिजे. शेतकर्‍यांना चांगल्या सेवा दिल्या पाहिजेत. शेतकर्‍यांना सावकाराकडे जावू लागू नये यासाठी त्यांना पाहिजे त्यावेळी व पुरेशा प्रमाणात कर्ज पुरवठा केला पाहिजे, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा सुविधा देणेचे काम आपली बँक करीत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. जलद बँकिंग व्यवहार करणेचे साधन म्हणजे मोबाईल बँकिंग होय. या ऍपचे माध्यमातून ग्राहकांना जलद सेवांचा लाभ मिळणार आहे. जिल्हा बँका ह्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकर्‍यांना सावकारीपाशातून सोडविणेसाठी जिल्हा बँकांनी चांगले काम करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना धोके विचारात घेवून त्याअनुषंगाने बँकांनी सायबर सिक्युरिटीकडे लक्ष दिले पाहिजे. सेवकांना सायबर प्रशिक्षण दिले पाहिजे. या बँकेचे कामकाज अत्यंत चांगले असून उत्तम प्रशासन आहे. यामुळेच या बँकेकडे आदराने पाहिले असे मत विद्याधन अनास्कर यांनी मांडले. 

याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, बँकेचे विद्यमान अध्यक्ष आ. श्री. छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमांस बँकेचे संचालक खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, सुनिल माने, दादाराजे खर्डेकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, अर्जूनराव खाडे, दत्तात्रय ढमाळ, अनिल देसाई, राजेश पाटील-वाठारकर, प्रकाश बडेकर, सौ. कांचन साळुंखे, सौ. सुरेखा पाटील, श्री. धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, श्री सुबोध अभ्यंकर, डीडीएम नाबार्ड सातारा, श्री. प्रकाश आष्टेकर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा, वीरमती सॉटवेअर कंपनीचे सीएमडी राजन शहा, तसेच बँकेचे माजी संचालक सदस्य, सरव्यवस्थापक, एस. एन. जाधव, एम. व्ही. जाधव, व्यवस्थापक, अधिकारी, व सेवक, विकास सोसायट्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध संस्था, सहकारी खरेदी विक्री संघ, अर्बन बँका, सहकारी पतसंस्था व ग्राहक संस्था, मजूर सोसायट्या, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.