Breaking News

प्रा. नितीन भांड यांना पीएचडी प्रदान


संगमनेर प्रतिनिधी 

येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत कार्यरत असलेले प्रा. नितीन भांड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि व्यवस्थापन शास्त्र शाखेत नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली. याबद्दल प्रा. नितीन भांड यांचा माजीमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी समवेत राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सुरेशराव थोरात, संजय कोल्हे, पी. वाय. दिघे आदींसह यशोधन कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नितीन भांड यांनी ‘ए स्टडी ऑफ मॅनेजमेंट इन्फॉरमेंशन सिस्टीम अ‍ॅण्ड इटस इम्पॅक्ट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन वुइथ रेफरन्स टू अहमदनगर डिस्ट्रीक्ट’ या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ. अविनाश गानबोटे यांचे मार्गदर्शन लाभले.